इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, 'झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन.' ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, 'अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे. पाडा झाला आहे.' असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.
मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रूखरूख लागून