श्यामची आई

त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळया लावीत.

शंकराच्या देवळात गर्दी होती. रूद्राचा गंभीर आवाज येत होता. रूद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या- त्या ऋषीच्या- डोळयांसमोर सर्व ब्रह्मांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळयासमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या सार्या गरजा त्याच्या डोळयासमोर आलेल्या आहेत. तो विश्वासी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते.

556 of 837