पैसे कोठून आणावयाचे! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.
आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बर्याेच नोटा होत्या, त्यातील एक लांबवावी, असे मी ठरविले. दुसर्यां चे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकटया भावास मी श्लोक शिकवीत होतो.