श्यामची आई

ते लोक धन्य होत. माझ्या असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रध्दामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.

माझ्या डोळयांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळया अश्रूंनी पाप-पर्वत पडला. 'श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!' असे आई म्हणाली.

आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे रडत आईला म्हटले, 'आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!'

577 of 837