'एक: शब्द: सम्यक् ज्ञात: स्वर्गेलोके कामधुग्भवति । ' एकच शब्द; परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. 'सम्यक् ज्ञात:' नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, 'लाव, लाव हात!' ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो.