श्यामची आई

घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. 'आई! मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.

'अण्णा आला, आई अण्णा!' धाकटया भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.

'इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?' आई विचारू लागली.

'सोंडेघरच्या पर्ह्यााला पाणी नव्हते का रे?' वडिलांनी विचारले.

'हो! परंतु मी आलो कसातरी?' मी म्हटले.

'त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!' वडील म्हणाले.

592 of 837