ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
'अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.
'मग सांगेन. घरात जा घेऊन.' मी म्हटले.
'आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान्. होय आई!' धाकटा भाऊ आईला विचारू लागला.
आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.
आई म्हणाली, 'श्याम! हा कोणाचा कोट?'
'मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल!' वडील म्हणाले.