श्यामची आई

'श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर, देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!'

वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते. सार्याव स्मृती होत्या.

'आई, याला कुंकू लावू?' पुरूषोत्तमाने विचारले.

'बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयास जा, हो.' आई म्हणाली.

597 of 837