मामा!' असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडीएवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती; परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन-तीन पपनसे पाडली, पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली, की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली 'रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा.' पपनसे फोडण्यात आली.