श्यामची आई

अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झर्यााचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला...' आई भावनाविवश झाली होती.

'बोलणे सोपे करणे कठीण. दुपारची वेळ झाली, म्हणजे समजेल सारे!' असे बोलून वडील बाहेर गेले.

धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, 'आई ! रडू नकोस. तू रडलीस, म्हणजे आम्हांला रडू येते. आई! तू सांगशील, ते काम आम्ही करू. रडू नकोस, आई!....'

लहान मुले मोठया आईची समजूत घालीत होती! फुले झाडाला आधार देत होती! करूण असे ते दृश्य होते.

664 of 837