श्यामची आई

आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, 'माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा.' 'जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू' त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. 'सांभाळ!' ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरूषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो.

689 of 837