श्यामची आई

वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठयाजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळयांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. 'माझ्या मायबापांना जप!' असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. 'जप, हो, बाळ. सांभाळ.' ते म्हणाले.

मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली.

690 of 837