बाबांनो! कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही, काही समजत नाही, चांगली सोन्यासारखी पोरे नेतो. आम्हाला रडावयाला राखतो!' असे आई रडत म्हणाली.
रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, 'माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही, तर महिन्याभराने जावेच लागणार ना? तू परवानगी दे.'
शेवटी आईने संमती दिली. दुसर्याआवर स्वत:ची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते,