तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळया फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.
परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तो पर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरूषोत्तमाने घोरिवडयातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, 'तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.'