शेणाचे दिवे लागणार.' आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? काय ग झाले? असे आईला विचारू लागला.
'बाळ! देवाची मर्जी; मी तरी काय सांगू तुला?' असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळयाला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, 'जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे.'
लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.