'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.
'श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?' नमूने विचारले. 'त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या