असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारूण्यमूर्ती! माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली.
शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिण दिवा जवळ होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते.
'श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!' ते म्हणाले.