श्यामची आई

तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जशाच्या तसा भस्ममय देह होता. वार्यातने इवली देखेल मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुध्द असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती.

लावला, मी हात लावला.

820 of 837