श्यामची आई

भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वत:च्या पत्नीच्या गळयात घालण्यासाठी नेले.

सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरूषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता.

821 of 837