'यशोदे, काही काळजी नको करु. पुरूषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन.' काय चमत्कार ! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन् कावळा शिवला.
माझ्या डोळयात पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरूषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोडयाळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून