मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असावयाची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली, तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायांत शेपटीचे फलकारे देत नाचावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता.
आईचे आजारपण वाढत चालले, तसतशी मथीही नीट खातपीतनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला, तरी ती दोन शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी तिला दूध-तूप