श्यामची आई

मार्गातील मोह मी दूर करते.' माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल! हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. इतर बंधुभगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुध्दात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वत:ला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या

833 of 837