अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. सार्याव माझ्या. हो माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वत:चा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम,