नाहीतर घामट केसात खोवतील! फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी. नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत.
आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी-सौंदर्यमयी मूर्ती, असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हावयाची. गुलबाक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी,