तीन वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळया मी तोडल्या. गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळयांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणिले. घरी आल्यावर मी एक ताम्हन घेतले व त्यात पाणी घालून कळया टाकून ठेविल्या.
संध्याकाळी आई म्हणाली, 'आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एकसुध्दा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही; पण धुपारतीला तरी चार आणून ठेव.'