संध्याकाळी फुले वेचायला; नाहीतर राग धरावयाचास तू. का आत्ताच येतोस? आपण छाप्पोपाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू.' बन्या म्हणाला.
माझी आई म्हणाली, 'आता उशीर झाला आहे. उद्या खेळा हो बन्या, बापू!'
मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, 'श्याम! दुसर्या च्या घरची फुले त्यांना न सांगता-सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी; परंतु सर्वात वाईट