पुढे चाललो. तिठ्ठयावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाडया किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाडया दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?