श्यामची आई

त्याप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसर्या घरातील आलेली मुलगी, तिचे आईबाप व्हावयाचे, हे खरे म्हटले तर सासूसासर्यां चे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते, की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील, तो सुदिन. सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यांत पाहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे.

सासरचे बोल जसे कारल्याचे वेल । गोड कसे लागतील काही केल्या।

सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी। रात्रंदिन रडविती धायी धायी।

363 of 837