श्यामची आई

रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता.

'श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ.' वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक,

413 of 837