श्यामची आई

त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.

आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला 'आई जाऊ?'

'कुठे रे बाबुल्या?' मी म्हटले.

'आईला आहे माहीत. जाऊ का?' त्याने विचारले.

आई म्हणाली, 'जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत नको बसू.' हसत सदानंद निघून गेला.

414 of 837