श्यामची आई

मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला.'

'ए गोयलेवाली! अग, इकडे ये.' मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, 'म्हाता-ये, आजारी का गं आहेस?'

'व्हय, माय. ताप लई येतो. काय करातांव, पोटाला हवं ना!' असे ती म्हणाली.

'दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?' आईने विचारले.

492 of 837