झोप लागेपर्यंत दे. मग खेळायला जा. श्याम! तुझाच ना तो भाऊ?' असे म्हणून आई गेली. उष्टयांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली.
माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला, तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टेशेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर