श्यामची आई

लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळयात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येताजाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती. परंतु अंगणात दिव्याची जरूरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरूषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो! दूर्वांची आजी, आईसुध्दा बसल्या होत्या.

522 of 837