की, 'त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते.' कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुध्दा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सद्सद्विवेकबुध्दीची टोचणी ती सदैव आहेच आहे.
'घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!' वडील म्हणाले.
'श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात