आधी, बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते! त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो, की नाही?' असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो.
वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, 'म्हटलं, श्याम आला, हो, आपला, आताच आला!' ते पाय धुऊन घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. 'श्याम! गणपतीवर आवर्तने करीत होतो. आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला!' असे म्हणून त्यांनी डोळयांना उपरणे लावले.