'नीज जरा अंथरूणावर, बाहेर थंडी आहे, नीज.' आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरूणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे, असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरूणावर निजणे, तिच्या पांघरूणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. किती तरी वेळा रात्री अंथरूणात असताना 'मी माझ्या आईच्या कुशीत आहे' हा विचार मी करीत असतो. ही