श्यामची आई

भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत, असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो.

घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरूषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली, ते त्याला मी सांगितले, कोकणात कोंबडीच्या अंडयाला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, 'तुला कवठ आवडते, रे? मी त्याच्यावर संतापलो.

720 of 837