श्यामची आई

असा विचार मनात येऊन तो त्या खडयांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.

गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.

'श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?' रामने विचारले.

'अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दूरूनच त्याला हात जोडीत असतो.' श्याम म्हणाला.

758 of 837