श्यामची आई

दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.

'इंदू ! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला.' आई पुरूषोत्तमास म्हणाली.

इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, 'मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन.' इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. 'पुरूषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल.' इंदू म्हणाली.

772 of 837