श्यामची आई

मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.

\"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?' आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले, म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.

\"अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर.' मावशी म्हणाली.

785 of 837