'माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता, यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला; परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वत:च्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते.
माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी