म्हणून आईला का नाही ओळखता येणार?'
अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरूषोत्तमला मावशी म्हणाली, 'राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा.' हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते!
त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे. परंतु ते अशक्य झाल्यापासून दुपारी धान्यफराळ करीत. सोजी खात. आई त्यांना म्हणाली,