'आज चतुर्थी ना? जा, स्नान करा. थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करू हो स्वत:चे जा. खाऊन घ्या.' तुटक- तुटक मोठया कष्टाने बोलत होती. वडील उठले. स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले.
आईने धाकटया पुरूषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला. अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली, 'बाळ चांगला राहा. हट्ट नको करू. दादा, अण्णा आहेत तुला. मावशी आहे. चांगला नीट वाग!' पुरूषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती.