जावयाचे होते. मी तेव्हा सहा-सात वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही; परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाडया, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची पन्नास-पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी-माणसे होती. बैलगाडया हर्णेबंदराला लागल्या. त्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हर्णेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे!