श्यामची आई

'समुद्राचा का चंद्र मुलगा?' एका लहान मुलाने विचारले.

'हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे.' परभारे नामदेवनेच उत्तर दिले.

श्याम वर्णनाच्या भरात होता. 'आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते. किंवा चंद्रच शेकडो रूपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे, असे वाटते. सारी मौज असते. वारे वहात असतात. नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात,

89 of 837