माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गडयाजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, 'वन्सं, माझ्याजवळ द्या त्याला. मी त्याला घेत्ये हो.' आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला; हसू खेळू लागला.
आई त्या लग्नात स्वत:च्या मुलासही रडवी परंतु वन्संच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की, राजेच ते! आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे,